
सातारा : निराधारांना आधार देणाऱ्या संजय गांधी निराधार व श्रावणबाळ निराधार योजनेचे लाभार्थी गेल्या दोन महिन्यांपासून अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. नवीन डीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज भरण्यात येत आहेत. त्यामुळे थेट संबंधितांच्या खात्यावर पैसे जाणार आहेत. हे अर्ज भरण्याकडे दुर्लक्ष झाल्याने व ई-केवायसीकडे लक्ष न दिल्याने या लाभार्थ्यांना आता तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहेत.