

Success Story
sakal
भुईंज : वाई येथील अभिषेक अभय ओझर्डे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत देशात ३३६ वी रँक मिळवत आयएएस होण्याचे स्वप्न पूर्ण केले.सध्या ते सहाय्यक आयुक्त महसूल विभाग कस्टम ॲण्ड इनडायरेक्ट टॅक्सेस यासाठी प्रशिक्षण घेत असून, प्रशिक्षण कालावधीतच त्यांनी ही परीक्षा देत पुन्हा एकदा आयएएस या पदावर पोहोचल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले.