akhil bhartiy marathi sahitya sammelan satara
sakal
साताऱ्यात झालेल्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज उत्साहात समारोप झाला. समारोपप्रसंगी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या वतीने १७ ठराव मांडून संमत करण्यात आले. यामध्ये राज्यात हिंदी अथवा तिसरी भाषा सक्तीने लादली जाणार नाही, याबाबत सरकारने स्पष्ट व लिखित अभिवचन द्यावे, हा प्रमुख ठराव संमेलनात एकमताने मंजूर करण्यात आला.