akhil bhartiy marathi sahitya sammelan
sakal
- आशिष तागडे, महिमा ठोंबरे
छत्रपती शाहू महाराज साहित्यनगरी (सातारा) - ‘शासन आणि प्रशासन हेच गेल्या ३५ वर्षांपासून मायमराठीचे खऱ्या अर्थाने ‘घरचे मारेकरी’ ठरले आहेत. मुंबईतील मराठी माणसांचा टक्का दिवसेंदिवस कमी होत आहे. या भूमीतले हत्ती आणि नवसाचे गणपतीसुद्धा आमचे राहिले नाहीत. त्यांना पुन्हा मिळविण्यासाठी आम्ही आता कोणत्या देवाकडे नवस बोलायचा?’ अशी सूचक टीका ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी केली.