बाप रे! कारवट गावाच्या हद्दीत बसचे चाक निखळले; अनर्थ टळला

बाप रे! कारवट गावाच्या हद्दीत बसचे चाक निखळले; अनर्थ टळला
Updated on

पाटण (जि. सातारा) : वनकुसवडे पठारावरील कारवट गावानजीक शनिवारी दुपारी एकच्या सुमारास पाटण आगाराच्या एसटी बसचे चाक निखळून अपघात झाला. या अपघातामध्ये बसमधील 12 प्रवासी जखमी झाले. जखमींमध्ये एसटीचे चालक आणि वाहकांचाही समावेश आहे. जखमी प्रवाशांना पाटण येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
 
याबाबत एसटी आगार आणि ग्रामीण रुग्णालय तेथून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी एक वाजता पाटण आगारातून सुटलेल्या पाटण ते अवसरी एसटी बस (एमएच 12 इएफ 6845) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास काठी अवसरी येथून परतताना कारवट गावाच्या हद्दीत एसटीचे चाक निखळून पडले. त्यामुळे एसटी रस्ता सोडून बाजूच्या खोल नाल्यामध्ये जाऊन धडकली.

या अपघातात अनुसया शिंदे, पारूबाई शिंदे, यशोदा शिंदे, विलास पवार (सर्व रा. कारवट), शोभा निकम शैलेश देसाई (दोघे रा. म्हारवंड), जगाबाई यमकर, धोंडीबा यमकर (दोघे रा. जोगी टेक), ऋषिकेश निकम, प्रकाश बावधने (दोघे रा. काठीटेक) आणि एसटीचे चालक उत्तम सूर्यवंशी (रा. घाणव) व वाहक शराफत शेख हे जखमी झाले आहेत. जखमींपैकी जगाबाई यमकर यांच्या डोक्‍याला गंभीर दुखापत झाली आहे. जखमींना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. याबाबत पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद झालेली नाही.

सातारा तालुक्यातील 54 जणांच्या जमिनी सरकारजमा हाेण्याच्या मार्गावर आहेत

रेल्वेमंत्री असताना लालूप्रसाद यादवांनी हेच केले हाेते; कऱ्हाडात चर्चा

आई उदे ग अंबे उदेचा औंधला जयघोष; रथोत्सव उत्साहात

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Satara City Bus Service Gets Green Signal 10 Mini Electric Buses Ordered After Sakal Campaign Know Proposed Routes
Doctor Dies During Treatment In Satara Amid Alleged Gun License Fitness Certificate Pressure Action Demanded
MBBS Success Story Sahil Jadhav From Valvan Village Achieves Doctor Dream Through Hard Work And Family Support
Satara District Bank Election 2026 Udayanraje Bhonsle Emerges Strong With 250 Resolutions And Key Political Influence
Marathi News Esakal
www.esakal.com