
सातारा जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या वाहनाला अपघात
सातारा - जिल्हा परिषदेतील 52 कर्मचारी कुलु मनाली या ठिकाणी प्रशिक्षणासाठी गेले होते. प्रशिक्षण संपवून माघारी निघाल्यानंतर त्या भागातील मंडी येथे या कर्मचाऱ्यांच्या वाहनाचा अपघात झाला असून त्यामध्ये एक जण किरकोळ जखमी झाला आहे. तर उर्वरित 51 जण सुखरूप आहेत. हे सर्व कर्मचारी मंडी या ठिकाणावरुन दुसऱ्या वाहनाने निघाले असून आज संध्याकाळी दिल्लीला येणार आहेत.
गेल्या काही दिवसापूर्वी जिल्हा परिषदेचे कर्मचारी प्रशिक्षणासाठी गेले होते. त्या ठिकाणचे प्रशिक्षण संपवून स्थानिक खासगी वाहनाने निघाले होते. मंडी येथे वाहनाचा अपघात झाला असून स्थानिक वाहन चालक गंभीर जखमी झाला आहे. यामधे एक कर्मचारी किरकोळ जखमी झाला असून त्यांना स्थानिक हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन सोडण्यात आले. सर्व कर्मचारी बुधवार पर्यत साताऱ्यात पोचणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी दिली आहे.
Web Title: Accident To Satara Zilla Parishad Staff Vehicle
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..