खरिपातील कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करा : शेखर सिंह

बँक शाखानिहाय खरीप हंगामात शेतकऱ्यांना कर्जवाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्‍याच्‍या सूचना
shekhar singh
shekhar singhSakal
Updated on

सातारा - खरीप हंगामातील कर्जवाटपाचा आढावा घेण्‍यासाठी आज जिल्हास्तरीय बँकर्स समितीची बैठक जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. बैठकीत श्री. सिंह यांनी प्रत्येक बँक शाखानिहाय खरीप हंगामात शेतकऱ्यांना कर्जवाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्‍याच्‍या सूचना केल्‍या.

सुरू होणाऱ्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना देण्‍यात येणाऱ्या पीक कर्जाचा आढावा घेण्‍यासाठी या बैठकीचे आयोजन करण्‍यात आले होते. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अंकुश परिहार, नाबार्डचे जिल्हा विकास प्रबंधक राजेंद्र चौधरी, बँक ऑफ महाराष्ट्रचे प्रबंधक विवेक नाचणे, जिल्हा अग्रणी व्यवस्थापक युवराज पाटील यांच्यासह विविध बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

आढावा घेतल्‍यानंतर श्री. सिंह यांनी शेतकऱ्यांना खरीप हंगामात कर्जप्रकरणांमध्ये अडचणी येत असतील तर त्याची माहिती कृषी विभागाने घेऊन त्यांना सुलभरित्या कर्ज कसे मिळेल, यासाठी प्रयत्न करण्‍याच्‍या सूचना केल्‍या. याचदरम्‍यान त्‍यांनी लघु उद्योजकांची कर्ज रकमेची मोठी मागणी नसते. त्यांच्या मागणीनुसार जास्तीत जास्त लघु उद्योजकांची कर्जप्रकरणे मंजूर करण्‍याबरोबरच बचत गटांची कर्जप्रकरणेही जास्तीत जास्त मंजूर करावीत, अशा सूचनाही त्‍यांनी केल्‍या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Javali Mourns Brave Soldier Tushar Bhilare; Family Left Devastated
Decades-Old Rehabilitation Issue Nears Resolution for 29 Dhom Dam Villages in Satara
Satara Leads by Example as Farmers Produce 25,482 Quintals of Soybean Seeds
UNESCO Kas Plateau flower blooming season
Marathi News Esakal
www.esakal.com