मलकापूरमध्ये पाच दुकाने सील; पालिकेची कारवाई

राजेंद्र ननावरे
Friday, 18 September 2020

मलकापूर पालिका कार्यक्षेत्रात कोणत्याही प्रकारच्या दुकानात ग्राहकांनी एकमेकांमध्ये सहा फुटाचे फुटांपेक्षा जास्त अंतर न ठेवणे, सोशल डिस्टंसिंगचे पालन न करता गर्दी केल्याचे निदर्शनास आल्याने संबंधित दुकानदारांवर कारवाई करण्यात आली.

मलकापूर (जि. सातारा) : कोरोनाच्या काळात सोशल डिस्टन्सिंग पाळण्याच्या सूचना देऊनही त्या न पाळणाऱ्या शहरातील पाच दुकानदारांना 15 हजारांचा दंड करून सात दिवसांसाठी दुकाने सील करण्याची कारवाई पोलिस व पालिकेच्या पथकाने केली. 

शहरातील पाच व्यावसायिकांवर प्रत्येकी तीन हजार रुपये प्रमाणे 15 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. कोरोना रूग्ण वाढण्याची शक्‍यता लक्षात घेऊन उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दुकानदारांसाठी नवीन आदेश दिले आहेत. त्यानुसार पालिका कार्यक्षेत्रात कोणत्याही प्रकारच्या दुकानात ग्राहकांनी एकमेकांमध्ये सहा फुटाचे फुटांपेक्षा जास्त अंतर न ठेवणे, सोशल डिस्टंसिंगचे पालन न करता गर्दी केल्याचे निदर्शनास आल्याने संबंधित दुकानदारांवर कारवाई करण्यात आली. 

ते देशासाठी लढले, अमर हुतात्मे झाले; सचिन जाधव अमर रहे!

त्यांना सात दिवसांपर्यंत दुकाने बंद करण्याची सक्ती करण्यात आली आहे. या पथकामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल शिरोळे, हवालदार गायकवाड, तसेच दोन होमगार्ड, पालिकेचे नोडल अधिकारी रामचंद्र शिंदे, सुभाष बागल, सुनील शिंदे, पंकज बागल यांचा समावेश होता. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Action On Five Shops At Malkapur Satara News