उदयनराजे समर्थकावर इंदापूरात गुन्हा दाखल

Udayanraje Bhosale Top Breaking News in Marathi
Udayanraje Bhosale Top Breaking News in Marathi System
Updated on

सातारा : खासदार उदयनराजे भाेसले (udayanraje bhosale) यांच्याबाबत अवमानकारक उदगार काढल्याचा दावा करीत उदयनराजे समर्थकांनी गुरुवारी (ता.24) इंदापूर (जि. पुणे) (indapur) येथे एका उद्याेजकाचे (industrialist) वाहन रस्त्यावर अडवून त्याचे कपडे फाडून त्यास ताेंडाला काळे फासले. त्यानंतर संबंधित समर्थकांनी उदयाेजकास स्थानिक पाेलिस स्टेशनला नेत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी पाेलिसांना केली. (activists-beats-industrialist-for-using-offensive-language-against-udayanraje-bhosale-indapur)

दरम्यान या घटनेतील एका समर्थकावर स्थानिक पाेलिसांनी काेविड 19 च्या अनुषंगाने लावण्यात आलेल्या निर्बंधांचे उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हा दाखल आहे. संबंधित घटनेची चाैकशी सुरु असल्याची माहिती तपासी अधिका-यांनी ई- सकाळशी बाेलतना दिली.

Udayanraje Bhosale Top Breaking News in Marathi
निवडणुकांसाठी स्वबळाचे वारे लागले घुमु; माेर्चेबांधणी सुरु

संबंधित उद्योजकाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. यामध्ये तो उद्योजक उदयनराजे यांचा गुंड असा उल्लेख करीत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यावरुन उदयनराजे समर्थकांनी इंदापुरातील संबंधित उद्योजकास रस्त्यात थांबवून त्याचे कपडे फाडले. त्यास काळे फासले. उद्योजकाची धिंड काढत त्याला पोलिस ठाण्यात नेले. उदयनराजेंना गुंड म्हटल्याने उद्योजकावर गुन्हा दाखल करा अशी मागणीही त्यांच्या समर्थकांनी केली.

दरम्यान या घटनेत काेविड 19 च्या नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी उदयनराजेंच्या समर्थकांपैकी एकावर गुन्हा दाखल केल्याची माहिती स्थानिक पाेलिस ठाण्यातून देण्यात आली. या प्रकाराचा तपास तपासी अधिकारी माने करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pune Satara Highway weekend traffic
Greater Flamingo sighting
Koyna Dam reservoir live storage report July 2026
Koyana Dam Water Release
Marathi News Esakal
www.esakal.com