Adani Project : कळंबेत ग्रामस्‍थांनी बंद पाडले अदानी प्रकल्पाचे काम; प्रोजेक्ट कृती विरोधी समितीची आक्रमक भूमिका

प्रोजेक्टच्या विरोधात प्रोजेक्ट विरोधी कृती समिती स्थापन झाली असून, त्यांनी तीव्र लढा सुरू केला आहे.
Adani Company Project
Adani Company Projectesakal
Summary

अदानी प्रोजेक्‍ट कृती विरोधी समितीने प्रत्‍यक्षपणे प्रकल्‍पाच्‍या साइटवर जाऊन तेथे सुरू असलेले टेस्टिंग आणि इतर काम बंद केले.

तारळे : कळंबे (ता. पाटण) येथे होऊ घातलेल्या अदानी कंपनीच्‍या (Adani Company) हायड्रो एनर्जी प्रोजेक्टच्‍या टेस्‍टिंगचे काम आज प्रोजेक्‍ट विरोधी कृती समिती आणि प्रोजेक्‍ट स्‍थळाच्‍या जवळपासच्‍या गावांतील काही ग्रामस्‍थांनी बंद पाडले.

यासंदर्भात समितीने दिलेली माहिती अशी, की ज्यावेळी पर्यावरणीय जनसुनावणीची जाहीर नोटीस वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली, त्या वेळी स्थानिकांना याबाबत माहिती झाली. त्यानंतर संपूर्ण माहिती घेऊन मार्चमध्ये झालेल्या जनसुनावणीला स्थानिकांनी प्रखर विरोध केला. तेव्‍हापासून प्रोजेक्टच्या विरोधात तारळे खोऱ्यात (Tarale Valley) चळवळ उभी राहिली आहे. प्रोजेक्टच्या विरोधात प्रोजेक्ट विरोधी कृती समिती स्थापन झाली असून, त्यांनी तीव्र लढा सुरू केला आहे.

Adani Company Project
महाबळेश्‍‍वर, पाचगणीतील हॉटेल्स, रिसॉर्ट्सवर कारवाई; साहित्‍यांसह मुलाबाळांना रस्त्यावर घेऊन येण्याची पर्यटकांवर वेळ!

प्रोजेक्ट स्थळावर टेस्टिंगचे काम सुरू होते. त्‍यामुळे तेथे जाऊन चौकशी केली असता, तिथे अदानी कंपनीने टेस्टिंगसाठी दुसऱ्या एका कंपनीला काम दिले असल्याचे समजले. काम सुरू असलेल्या ठिकाणी त्यांचे सुपरवायझर आणि कामगार उपस्थित होते. त्यांना कामाबद्दल विचारणा केल्‍यावर संबंधित परवानगी आणि मशिन चालवण्याचा परवाना यासंदर्भातील कोणतीच कागदपत्रे त्यांच्याकडे उपलब्ध नव्हती.

वास्तविक, असे काम करत असताना अदानी कंपनीकडे जर अधिकृतपणे टेस्टिंग करायला परवानगी असेल, तर ती कागदपत्रे साइटवर उपलब्ध असायलाच हवी. त्याशिवाय त्यांनी त्या कंपनीला दिलेली वर्कऑर्डरसुद्धा उपलब्ध असायला हवी. त्याचबरोबर ज्‍या कंपनीची मशिन सुरू आहे, ते मशिन ऑपरेट करण्याचे लायसन्स आणि इतर सर्वच परवान्याची प्रत साइटवर उपलब्ध असायला हवी; परंतु असे काहीही तिथे उपलब्ध झाले नाही.

Adani Company Project
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीचा कळंबा कारागृहात खून; नेमकं काय घडलं? मृतदेह स्वीकारण्यास पत्नीचा का नकार?

संबंधित कंपनीच्या मुंबईतील व्‍यवस्‍थापकाशी बोलल्यावर या संपूर्ण कामाबद्दल ठोस माहिती दिली नाही, तसेच काहीही कागदपत्रे सुद्धा दाखविण्याची तयारी दिसून आली नाही. त्यामुळे आम्ही सर्वांनी संपूर्ण विभागाच्या हिताच्या दृष्टिकोनातून त्या व्‍यवस्‍थापकाला काम बंद करणेस सांगितले व त्यांनीही वरील सर्व कागदपत्रे उपलब्ध नसल्याने आणि आपला स्थानिक म्हणून असलेला विरोध लक्षात घेऊन हे काम बंद केले.

आज अदानी प्रोजेक्‍ट कृती विरोधी समितीने प्रत्‍यक्षपणे प्रकल्‍पाच्‍या साइटवर जाऊन तेथे सुरू असलेले टेस्टिंग आणि इतर काम बंद केले. साइटवर कागदोपत्री कोणतीही परवानगी समितीस आढळून आली नाही, तसेच अदानी कंपनीकडून काम घेतलेल्या ठेकेदार यांच्याकडे कोणताही परवाना किंवा कागदपत्रे नसताना काम सुरू असल्यामुळे ते बंद करण्यात आले. स्थानिकांना विश्वासात घेतल्याशिवाय यापुढे कोणतेही काम करू नये, अशा सूचनाही ठेकेदारास दिल्‍या आहेत.

-बाळासाहेब सपकाळ, सदस्य, प्रोजेक्ट विरोधी कृती समिती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com