Patan News : आदित्य उमेश मोरे याने अथक मेहनत, जिद्द, आत्मविश्वासाच्या जोरावर त्याने हे ध्येय गाठून आसाम रायफल्समध्ये कॉन्स्टेबलपदी निवड झाली. ते समजताच ग्रामस्थ, मित्रमंडळींनी फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण करत त्याची मिरवणूक काढली.
ढेबेवाडी : साईकडे (ता. पाटण) गावचे सुपुत्र आदित्य उमेश मोरे यांची ‘आसाम रायफल्स’मध्ये कॉन्स्टेबलपदी निवड झाल्याबद्दल ग्रामस्थ व मित्रपरिवाराने फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करत तळमावले व साईकडेत त्यांची मिरवणूक काढली.