- सचिन शिंदे
कऱ्हाड - दिवसा कडक ऊन, तर रात्रीची थंडी सहन करत कऱ्हाड व उंब्रजच्या तीन सायकलपटूंनी धाराशिव, बीड, गेवराई असा एक हजार २०० किलोमीटरचा टप्पा स्वबळावर अवघ्या ८८ तासांत पूर्ण केला.
पश्चिम महाराष्ट्रापेक्षाही अत्यंत वेगळे हवामान असतानाही लांब पल्ल्याच्या अंतराला न घाबरता तिघा सायकलपटूंनी पूर्ण केलेला सायकलचा प्रवास जिल्ह्यात चर्चेचा ठरला आहे. या तिघा सायकलपटूंना एलआरएम सायकलिंग पूर्ण करण्याचा जिल्ह्यातील पहिला मान मिळाला आहे.