आरक्षणासाठी लवकर योग्य मार्ग काढा अन्यथा...; वाईत मराठा 'क्रांती' ची निदर्शने

भद्रेश भाटे
Thursday, 17 September 2020

संघटनेच्या मागणीचा गांभीर्याने विचार व्हावा आणि आरक्षणाबाबत लवकरात लवकर योग्य मार्ग काढावा. अन्यथा भविष्यातील आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी शासनावर राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
 

वाई (जि. सातारा) : येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर वाई तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. या वेळी आरक्षणाबाबत घोषणाबाजी करण्यात आली. या वेळी मोर्चाच्या वतीने प्रांताधिकारी संगीता राजापूरकर- चौगुले यांना आपल्या मागणीचे निवेदन देण्यात आले.
 
मराठा समाज गेली अनेक वर्षे शैक्षणिक व नोकरीमध्ये आरक्षण मिळावे, यासाठी राज्यात विविध प्रकारची आंदोलने करीत आहे. 2019-20 मध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने राज्यभर लाखोंच्या संख्येने शिस्तबद्ध मोर्चे काढण्यात आले. परिणामी तत्कालीन सरकारने शिक्षणात व नोकरीत आरक्षण लागू केले. मात्र, सद्यःस्थितीत न्यायालयात प्रलंबित असलेल्या खटल्यामुळे, तसेच न्यायालयात मराठा आरक्षणाबाबत योग्य ती बाजू मांडली न गेल्याने मिळालेले आरक्षण रद्द केले आहे.

मलबार हिल परिसरात एक चौरस फुटांचा फ्लॅट घ्यायचाय ? किंमत वाचाल तर डोळे पांढरे पडतील

त्यामुळे वाई तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मराठा समाजाला आरक्षण हे मिळालेच पाहिजे, या मागणीसाठी सलग पाच दिवस आंदोलन करण्यात येत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. संघटनेच्या मागणीचा गांभीर्याने विचार व्हावा आणि आरक्षणाबाबत लवकरात लवकर योग्य मार्ग काढावा. अन्यथा भविष्यातील आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी शासनावर राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

...तरच आम्ही पुढाकार घेऊ; मराठा आरक्षणाच्या मुद्यावर उदयनराजेंचे माेठे वक्तव्य

राेटरीच्या दातृत्वाला सलाम...काेविड रुग्णांसाठी 11 ऑक्‍सिजन मशिन

Edited By : Siddharth Latkar सातारा सातारा सातारा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Agitation For Maratha Reservation Maratha Kranti Morcha Sanghtna Wai Satara News