esakal | समाजावर उपासमारीची वेळ; कऱ्हाडात तहसील कार्यालयावर गाढवांसह मोर्चा
sakal

बोलून बातमी शोधा

Vadar Community

खाणपट्यातून दगड-माती उत्खननास परवानगी मिळावी, अशी मागणी वडार समाजाने केली होती.

समाजावर उपासमारीची वेळ; कऱ्हाडात तहसील कार्यालयावर गाढवांसह मोर्चा

sakal_logo
By
हेमंत पवार

कऱ्हाड (सातारा) : नांदलापूर व पाडळी-केसे येथील खाणपट्यातून दगड-माती उत्खननास वडार समाजाला (Vadar Community) परवानगी मिळावी, या मागणीसाठी आज कऱ्हाड (जि. सातारा) येथील तहसील कार्यालयावर (Tehsil Office) मोर्चा काढण्यात आला. यावेळी मागण्यांचे निवेदन प्रभारी तहसीलदार यांना देण्यात आले.

मोर्चात कासासाहेब चव्हाण, जयवंत पवार, सूर्यकांत पवार, शुभम कुसाळकर, किरण धोत्रे, किशोर चव्हाण यांच्यासह समाजातील अनेकजण सहभागी झाले होते. निवेदनातील माहिती अशी : नांदलापूर व पाडळी-केसे येथील खाणपट्यातून दगड-माती उत्खननास परवानगी मिळावी, अशी मागणी वडार समाजाने केली होती. मात्र, तहसीलदार यांना खाणपट्याची मोजणी झाली नसल्याचे कळवले आहे. मात्र, त्यांची मोजणी झाल्याबाबत पत्रामध्ये उल्लेख आहे. त्यामुळे चुकीचा अहवाल दिला जात आहे. त्यामुळे वडार समाजावर उपासमारीची वेळ आलीय. त्याविरोधात आज आम्ही गाडवांसह मोर्चा काढला असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा: चर्चा तर होणारच! जिल्हा बँकेचं राजकारण तापलं; BJP-NCP आमदार एकत्र?

loading image
go to top