शेतकऱ्यांच्या समस्यांचा आता बांधावरच फैसला; कृषिमंत्री दादा भुसेंचे फर्मान

हेमंत पवार
Sunday, 27 September 2020

या उपक्रमामुळे आठवड्यातून तीन दिवस शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन त्यांच्या समस्या जागेवरच निकाली निघतील अशी आशा आहे.
 

कऱ्हाड ः शेतकरी काबाडकष्ट करून, कर्ज काढून मोठ्या हिमतीने दर हंगामात पिके घेतो. मात्र, त्याला निसर्गाची साथ मिळेल असे नाही. दर हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे त्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांवर कर्जबाजारी होण्याची वेळ येते. त्यातून अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्याही केल्या आहेत. त्याचा विचार करून कृषिमंत्री दादा भुसे यांच्या पुढाकारातून आता शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्यांचा त्यांच्या बांधावर जाऊन निपटारा करण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. त्यानुसार आता कृषिमंत्री, वरिष्ठ कृषी अधिकारी, कर्मचारी हे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या सोडवणार आहेत.

शेतकरी वर्ग बॅंका, पतसंस्थांची कर्जे काढून, प्रसंगी व्याजाने पैसे घेऊन शेतीच्या मशागातीपासून पेरणीपर्यंत कार्यवाही करतात. पिके चांगली येतात. मात्र, पिके ऐन भरात आल्यावर आणि काढणीच्या काळात निसर्गाचा त्याला अनेकदा फटका बसतो. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशेवरच पावसाचे पाणी फिरते. हातातोंडाशी आलेली पिके वाया जाऊन शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतो. त्यामुळे शेतकऱ्यांवर कर्जबाजारी होण्याची वेळ येते. त्यामुळे पर्यावरणाच्या बदलामुळे बिघडलले निसर्गचक्र, अवेळी पडणारा पाऊस, अतिृवष्टी, दुष्काळ आदी कारणांमुळे शेतकऱ्यांचे घटणारे उत्पादन, नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे नुकसान, उत्पादित शेतमालाला योग्य बाजारभाव न मिळणे, त्यामुळे शेतकऱ्यांना बसणारा आर्थिक भुर्दंड यामुळे निर्माण झालेली चिंता याचा विचार करता शेकऱ्यांशी संवाद साधणे गरजेचे असल्याचे कृषिमंत्री भुसे यांच्या लक्षात आले आहे.

डाॅक्टरकडून लाखाेंची खंडणी उकळणा-या पुण्यासह साता-यातील महिलेस अटक

त्यानुसार त्यांच्यासह कृषी राज्यमंत्री, एसीत बसून कार्यरत असणारे वरिष्ठ अधिकारी, त्यांच्या खालील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना आता त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याचे फर्मान काढले आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांना आता 15 दिवसांतून, आठवड्यातून, तीन दिवसांतून एकदा शेतकऱ्यांच्या बांधांवर जाऊन त्यांच्या समस्या ऐकून घेऊन त्यांचा निपटारा करावा लागणार आहे. त्यासाठीची कार्यवाही तातडीने सुरू करण्याचे आदेश कृषिमंत्री भुसे यांनी दिले आहेत. 

कृषी सहायकांवर भार 

कृषी विभागाकडून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवण्यात येतात. त्या शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्याचे काम प्रामुख्याने कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक करतात. त्यामुळे त्या योजनांच्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी कृषी सहायक आणि कृषी पर्यवेक्षक यांनी जास्तीत जास्त शेतकऱ्यांशी संवाद साधण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यानुसार आता त्यांना कार्यवाही करावी लागणार आहे. 

रुग्णांच्या नातेवाइकांची ससेहाेलपट थांबविण्यासाठी राष्ट्रवादीची विशेष हेल्पलाईन

...असे असेल भेटीचे शेड्युल 

कृषिमंत्री, कृषी राज्यमंत्री, कृषी सचिव, कृषी आयुक्त, मंत्रालयीन स्तरावरील कृषी विभागातील अधिकारी, कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ यांनी 15 दिवसांतून एकदा, सर्व कृषी संचालक व विभागीय कृषी सहसंचालकांनी आठवड्यातून एकदा, सर्व कृषी अधीक्षक आणि कृषी अधिकारी यांनी आठवड्यातून दोनदा, सर्व उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडल कृषी अधिकारी यांनी आठवड्यातून तीन दिवस शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन त्यांच्या समस्या जागेवरच निकाली काढाव्या लागणार आहेत.

अर्थव्यवस्था कोलमडल्यामुळे गेल्या 12 कोटी लोकांच्या नोकऱ्या : पृथ्वीराज चव्हाण

Edited By : Siddharth Latkar सातारा सातारा सातारा सातारा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Agriculture Minister Dada Bhuse Initative To Solve Problems Of Farmers Satara News