esakal | Karad : एसटीकडून थेट शाळेत पास वाटप; विद्यार्थिनींत समाधान
sakal

बोलून बातमी शोधा

Karad : एसटीकडून थेट शाळेत पास वाटप; विद्यार्थिनींत समाधान

Karad : एसटीकडून थेट शाळेत पास वाटप; विद्यार्थिनींत समाधान

sakal_logo
By
हेमंत पवार

कऱ्हाड : शाळा नुकत्याच सुरू झाल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची शाळांत वर्दळ वाढली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना अहिल्याबाई होळकर शासकीय योजनेतनू मोफत बसपास देण्यात येतात. त्याचे थेट शाळेत जाऊन वाटप करण्याचा उपक्रम कऱ्हाड (जि.सातारा) येथील एसटी आगाराचे व्यवस्थापक विजय मोरे यांनी राबवला आहे. त्यामुळे विद्यार्थिनींतून समाधान व्यक्त होत आहे.

सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी शहरातील शाळांत येतात. शासनाने विद्यार्थिनींसाठी अहिल्याबाई होळकर मोफत एसटी पास योजेतून पास दिले जातात. ते घेण्यासाठी त्यांना अनेक तास रांगेत उभे राहावे लागते. कोरोनामुळे ते शक्य नसल्याने त्यांना आता थेट शाळांतच पास देण्याचा उपक्रम एसटीचे येथील आगारप्रमुख मोरे यांनी हाती घेतला आहे. त्याअंतर्गत त्याचे पहिल्यांदा प्रातिनिधिक येथील टिळक हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील ३५३ विद्यार्थिनींना पास वाटप करून करण्यात आले.

आगार व्यवस्थापक मोरे, प्राचार्य गोकुळ अहिरे, उपप्राचार्य प्रा. धनाजीराव देसाई, वाहतूक निरीक्षक किशोर जाधव, वाहतूक नियंत्रक अनिल सावंत यांच्या हस्ते त्याचे वाटप करण्यात आले. पर्यवेक्षक प्रा. राजेश धुळगुडे, प्रा. संदीप जोशी, प्रा. शांतीनाथ मलाडे, प्रा. अजित कुलकर्णी, प्रा. विद्या शिर्के, प्रा. शमा शेख आदी उपस्थित होते. प्राचार्य अहिरे यांनी उपक्रमाबद्दल एसटीच्या अधिकाऱ्यांचे कौतुक केले. उपप्राचार्य देसाई यांनी स्वागत केले. पर्यवेक्षक प्रा. राजेश धुळगुडे यांनी आभार मानले. प्रा. संदीप जोशी यांनी सूत्रसंचालन केले.

loading image
go to top