
सातारा : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनी बुधवारी साताऱ्यात ठिकठिकाणी शिवछत्रपतींचा जागर होणार आहे. यासाठीच्या तयारीला अंतिम स्वरूप आले असून, भगवे झेंडे, कमानी आणि चौकाचौकांत उभारण्यात येणाऱ्या देखाव्यांमुळे संपूर्ण सातारा शिवछत्रपतीमय झाला आहे. शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला अजिंक्यतारा किल्ल्याचे पूजन व त्यानंतर मशाल महोत्सवाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात देखील हजारो सातारकरांनी सहभाग नोंदवत संपूर्ण किल्ला परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने दुमदुमून सोडला होता.