सातारा : अजिंक्यतारा किल्ल्यावर पर्यटनवाढीला चालना देण्यासाठी शिवसृष्टी साकारली जाणार आहे. त्याकरिता पर्यटन विभाग व जिल्हा नियोजन समिती, तसेच विविध माध्यमांतून निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे, तर शाहूनगरीचे भाग्यविधाते छत्रपती शाहू महाराज यांचा पुतळा नगरपालिकेच्या नूतन प्रशस्त इमारतीत बसविला जाणार आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.