'अत्याचार करणारे कितीही मोठे असले, तरी त्याचा मुलाहिजा बाळगू नका'

Ajit Pawar
Ajit Pawaresakal

वडूज (सातारा) : पोलिसांनी (Police) सर्वसामान्य जनतेवर नाही, तर गुन्हेगारांवर वचक ठेवावा, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी व्यक्त केले. येथील पोलिस ठाण्याच्या नवीन इमारतीच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर (Speaker Ramraje Naik Nimbalkar), पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, जिल्हाधिकारी शेखर सिंह, विशेष पोलिस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, निवृत्त सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, रणजितसिंह देशमुख, मानसिंगराव जगदाळे, सुरेंद्र गुदगे, सुभाषराव शिंदे, संदीप मांडवे, शशिकला देशमुख, जयश्री कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.

Summary

गुन्हेगारीतून पैसा मिळवून प्रतिष्ठा घेणाऱ्यांना पोलिसांनी ताळ्यावर आणावे. समाजामध्ये पोलिसांची विश्वासार्हता वाढणे गरजेचे आहे.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, ‘‘गुन्हेगारीतून पैसा मिळवून प्रतिष्ठा घेणाऱ्यांना पोलिसांनी ताळ्यावर आणावे. समाजामध्ये पोलिसांची विश्वासार्हता वाढणे गरजेचे आहे. त्यासाठी पुणे जिल्ह्याच्या धर्तीवर स्मार्ट पोलिसिंग योजना राबवावी. नियमित कामात सकारात्मक बदल घडवून आणावेत. पोलिसांना पायाभूत सुविधेसाठी वाढीव निधी मंजूर केला जाईल. समाजात होणाऱ्या वाढत्या अत्याचाराच्या घटना चिंतनीय आहेत. अत्याचार करणारे कितीही मोठे असले, तरी त्याचा मुलाहिजा बाळगू नका. किशोरवयीन मुलामुलींच्या दैनंदिन वागण्याकडे पालकांनी जाणीवपूर्वक लक्ष द्यावे. शक्ती कायदा राबविण्यासंदर्भात गांभीर्याने विचारविनिमय सुरू आहे. मात्र, या कायद्याचा दुरुपयोग होता कामा नये.’’

Ajit Pawar
नेता असावा तर असा! भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचा घरी जावून गडकरींकडून 'सन्मान'

पोलिस ठाण्याच्या नवीन इमारतीसाठी मोठा निधी खर्च करूनही इमारतीचे काम दर्जेदार न झाल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. श्री. देसाई म्हणाले, ‘‘पोलिसांनी कोरोना काळात मोठ्या प्रमाणावर दंड वसूल केला आहे. ती रक्कम नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामपंचायतींकडे वर्ग केली. यापैकी ५० टक्के रक्कम पोलिस कल्याण निधीसाठी देण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा.’’ पालकमंत्री पाटील यांनी विकासकामांच्या निधीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस व उपमुख्यमंत्री पवार यांनी नेहमीच झुकते माप दिले असल्याचे सांगितले. अजय कुमार बन्सल यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. कार्यक्रमास पोलिस उपअधीक्षक नीलेश देशमुख, सहायक पोलिस निरीक्षक मालोजीराव देशमुख, दादासाहेब गोडसे, सुनील गोडसे, बाळासाहेब सोळसकर, निवृत्त प्राचार्य दिलीपराव डोईफोडे, पृथ्वीराज गोडसे आदी उपस्थित होते.

Ajit Pawar
Ajit Pawar
Ajit Pawar
महिलांवरील अत्‍याचारावर दोन गृहराज्‍यमंत्र्यांचं तोंड बंद का?

खासदार, आमदार उद्‌घाटनानंतर गेले निघून...

इमारतीचे औपचारिक उद्‌घाटन झाल्यानंतर सभेपूर्वीच खासदार रणजितसिंह निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, भाजपचे जिल्हा संपर्कप्रमुख सदाशिव खाडे हे निघून गेले. ते का निघून गेले? याबाबत गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांना पत्रकारांनी छेडले असता ते म्हणाले, ‘‘नियमाप्रमाणे पत्रिकेत त्यांचे नाव आहे. उद्‌घाटन फोटो सेशनवेळी त्यांना आवर्जून जवळ घेण्याचा प्रयत्न केला, तरीही ते निघून गेले. याबाबत त्यांनाच विचारा.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com