कऱ्हाड : कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील (Karad South Assembly Constituency) काँग्रेसच्या निर्णायक ॲड. उदयसिंह पाटील- उंडाळकर (Adv. Udaysinh Patil- Undalkar) यांच्या गटाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत काल राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या शक्तीप्रदर्शनाने प्रवेश केला. ॲड. उंडाळकरांचा हा राष्ट्रवादी प्रवेश काँग्रेसची ताकद क्षीण करणारा आहे. यापूर्वीही काही स्थानिक नेते काँग्रेसमधून (Congress) बाहेर पडले असल्याने आताच्या या राजकीय खेळीने राष्ट्रवादीच्या गटाला नवसंजीवनी मिळाली आहे.