सातारा : माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तुम्ही काळजी करू नका. जनतेचा पाठिंबा असेल तर आमची राष्ट्रवादी वाढेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साताऱ्यात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. रामराजेंनी अनुपस्थितीबाबत माझ्याशी चर्चा केली होती, असेही त्यांनी स्पष्ट केले.