मी भाजपमध्ये असूनही अजित पवारांचं मला चांगलं सहकार्य, असं का म्हणाले आमदार शिवेंद्रराजे? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit Pawar Shivendrasinhraje Bhosale

'मी भाजपमध्ये असलो किंवा अन्य कुठल्याही पक्षांमध्ये असलो तरी काळजी करू नका.'

मी भाजपमध्ये असूनही अजित पवारांचं मला चांगलं सहकार्य : आमदार शिवेंद्रराजे

कुडाळ (सातारा) : मी भाजप (BJP) पक्षाचा आमदार असलो तरी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडून नेहमीच मला विकासकामांसाठी मोठे सहकार्य मिळत असते. पक्षपातळीवरील राजकारणाचा विकासकामे करताना आजपर्यंत कधीही अडचण आली नाही. जावळी तालुक्याच्या रस्त्यांसाठी २५ कोटी रुपयांचा निधी अजित पवारांनी दिला आहे. त्यामुळे शिवेंद्रराजे भाजपमध्ये आहेत, तालुक्याचा विकास होणार नाही, असे सांगून स्वतःची राजकीय पोळी भाजून घेणाऱ्या विरोधकांना ही एक प्रकारे चांगली चपराक आहे, असा टोला आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendrasinharaje Bhosle) यांनी लगावला.

सरताळे (ता. जावळी) येथे विकास सेवा सोसायटीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत निवडून आलेल्या संचालकांच्या सत्कार समारंभप्रसंगी ते बोलत होते. या वेळी प्रतापगड कारखान्याचे अध्यक्ष सौरभ शिंदे, किसन वीर कारखान्याचे (Kisan Veer Factory) संचालक हिंदुराव तरडे, जयदीप शिंदे, समीर आतार, बंडा पवार, सुनील भिसे, दस्तगीर शेख यांच्यासह ग्रामस्थ व संचालक उपस्थित होते. आमदार भोसले म्हणाले,‘‘ पावसाळ्यात जावळी तालुक्यातील खराब झालेल्या रस्त्यांची कैफियत उपमुख्यमंत्री पवार यांच्यासमोर मांडली असता मी भाजपमध्ये असतानाही अजित पवार यांनी जावळी, साताराच्या रस्त्यांसाठी तत्काळ २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून दिला. ही बाब तालुक्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे.’’

हेही वाचा: 'त्या वक्तव्यांवर लोक हसतात, त्यांना गांभीर्यानं घेत नाहीत'

राष्ट्रवादीच्या (NCP) कार्यक्रमाच्या दौऱ्यासाठी आलेल्या उपमुख्यमंत्री पवार यांनी विशेष करून मी जिथे उपस्थित नव्हतो, त्या ठिकाणी माझ्या नावाचा उल्लेख करून माझ्या कार्याबाबत कौतुक केले, हे माझ्यासाठी खूप मोठे आहे. विकासकामे करताना पक्षापेक्षा सर्वसामान्य जनतेची कामे महत्त्वाची असतात. म्हणूनच माझ्यासारखा आमदार काम करत आहे. त्याची पोचपावती सर्वसामान्य जनतेकडून मिळत आहे. त्यामुळे कोण मुंबईवरून येऊन इथं दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय, त्यालाही सर्वसामान्य जनता उत्तर देईल. त्यामुळे अशा प्रवृत्तीकडे लक्ष देऊ नका, असेही त्यांनी सांगितले. या वेळी नूतन संचालकांचा सत्कार आमदार भोसले यांच्या हस्ते करण्यात आला.

हेही वाचा: CM ठाकरे-निवडणूक आयोग अधिकाऱ्यांची महत्वाची बैठक, काय झाली चर्चा?

मी भाजपमध्ये असलो किंवा अन्य कुठल्याही पक्षांमध्ये असलो तरी काळजी करू नका. आपल्या तालुक्याच्या विकासाला एक रुपयाही कमी पडू देणार नाही.

-शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार

Web Title: Ajit Pawar Support To Me Despite Being In Bjp Mla Shivendrasinhraje Bhosale

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :BjpSataraAjit PawarNCP
go to top