
सातारा : उपमुख्यमंत्री अजित पवार रविवारी (ता. २४) जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या हस्ते व मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील व खासदार नितीन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत माणचे जिल्हा बॅंकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश सोहळा होणार आहे, अशी माहिती जिल्हा सरचिटणीस श्रीनिवास शिंदे यांनी दिली आहे.