esakal | वारकरी संप्रदाय युवा मंचचा ठाकरे सरकारला इशारा; काय म्हणाले अक्षयमहाराज भोसले वाचा
sakal

बोलून बातमी शोधा

वारकरी संप्रदाय युवा मंचचा ठाकरे सरकारला इशारा; काय म्हणाले अक्षयमहाराज भोसले वाचा

धृतराष्ट्र जसा वाईट कार्यास मदत करत होता तसे सरकार अध्यात्म सोडून सगळ्यांना सहकार्य करत आहे. कार्तिक वारी तोंडावर येऊन ठेपली आहे. आषाढी वारी वेळी आम्ही आपले ऐकले ती आमची चूक झाली आता पुन्हा असे होणार नाही. शासनाने योग्य निर्णय न घेतल्यास घडणाऱ्या घटनेस सर्वोतोपरी शासनच जबाबदार राहिल असा इशारा अक्षयमहाराज भाेसले यांनी दिला.

वारकरी संप्रदाय युवा मंचचा ठाकरे सरकारला इशारा; काय म्हणाले अक्षयमहाराज भोसले वाचा

sakal_logo
By
रुपेश कदम

दहिवडी (जि. सातारा) : राज्यातील महाआघाडीचे सरकार धृतराष्ट्रासारखे आंधळे असून ते चुकीच्या गोष्टींची पाठराखण करत आहेत. या सरकारला दारु हवी आहे मात्र देवळे नको आहेत अशा शब्दात वारकरी संप्रदाय युवा मंच महाराष्ट्रचे अध्यक्ष अक्षयमहाराज भोसले यांनी सरकारवर आसूड ओढले.

अक्षयमहाराज भोसले म्हणाले महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता प्रसार पाहता वारकरी संप्रदायाने आषाढी वारी बाबत सामंजस्याची भूमिका घेत कित्येक वर्षांच्या वारीचे भव्य स्वरुप सिमित केले. शासनास सर्वोतोपरी सहकार्य केले. शासनाचे मात्र केवळ आपले गल्ला कसा भरेल याच्याकडे लक्ष आहे. म्हणूनच सरकारने दारुची दुकाने सुरु केली आहेत. दारुच्या विक्रीतून खूप मोठा महसूल जमा होतो असे उदाहरण दिले. आता सरकारने एक तरी दारुचा दुकान मालक कोरोनाकाळात मदतीस सरसावला का हे दाखवावे. उलट शेकडो लोकांची कुटूंबे या व्यसनापायी रस्त्यावर आली.

हिप हिप हुर्ये... स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत कऱ्हाड पालिका देशात अव्वल 

दूसरीकडे मंदिरांनी, देवस्थानांनी भाविकांच्या मदतीसाठी तिजोऱ्या रिकाम्या केल्या. अनेक धार्मिक संस्था रुग्णांच्या सेवेसाठी पुढे आल्या. या गोष्टींचा शासनास विसर पडला आहे असे दिसून येते. खर्या अर्थाने अध्यात्मिकतेतून मिळणार्या सकारात्मक ऊर्जेची आज समाजास गरज आहे. मात्र ही उर्जा प्रदान करणारी धार्मिक स्थळे अद्याप बंद आहेत. शासनाने सर्व उघडले पण देवळे अद्याप बंद ठेवली आहेत. जर मंदिरे उघडली तर कोरोना पसरेल असे लोकप्रतिनिधी सांगतात. त्यांना आमचा प्रश्न आहे की दारुची दुकाने, विवाह सोहळे, व्यापारी दुकाने आदींच्या माध्यमातून कोरोना पसरत नाही का? 

काॅलेजचा हा प्रश्न साेडविण्यासाठी माणदेश एकवटला; कुणी दहा दिले तर कुणी लाख

कर्मचारी जीवावर उदार, करताहेत कोविड रुग्णांवर अंत्यसंस्कार!

त्यामुळे समाजाची फसवणूक करणे थांबवा. मुख्यमंत्री महोदयांनी तातडीने सर्व धार्मिक स्थळे उघडण्याचा आदेश द्यावा. तसेच अध्यात्मिक क्षेत्राला आवाहन करावे की अध्यात्मातून लोकांचे प्रबोधन करावे. याचा समाजावर सकारात्मक परिणाम घडेल. कीर्तन, प्रवचने यातून समाजात परिवर्तन होऊ शकते. लोकांना आता आधारची गरज आहे ना की भाषणांची. धृतराष्ट्र जसा वाईट कार्यास मदत करत होता तसे सरकार अध्यात्म सोडून सगळ्यांना सहकार्य करत आहे. कार्तिक वारी तोंडावर येऊन ठेपली आहे. आषाढी वारी वेळी आम्ही आपले ऐकले ती आमची चूक झाली आता पुन्हा असे होणार नाही. शासनाने योग्य निर्णय न घेतल्यास घडणाऱ्या घटनेस सर्वोतोपरी शासनच जबाबदार राहिल असा इशारा अक्षयमहाराज यांनी दिला.

कॅबिनेटच्या बैठकीत याची चर्चाच नाही, राजू शेट्टींसह राज्यातील आंदाेलकांचा हिरमाेड 

Edited By : Siddharth Latkar

loading image
go to top