esakal | यंदाचा आषाढी सोहळा पायी वारीच्या स्वरूपात असावा का ? गावांकडून मागविली माहिती
sakal

बोलून बातमी शोधा

Ashadi Wari

यंदाचा आषाढी सोहळा पायी वारीच्या स्वरूपात असावा का ?

sakal_logo
By
किरण बाेळे

फलटण शहर (जि. सातारा) : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यावर (sant dnyaneshwar maharaj palkhi sohala) सलग दुसऱ्या वर्षीही कोरोना महामारीचे (covid19 pandemic) सावट आहे. त्यामुळे वारीच्या (wari) पार्श्वभूमीवर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या वतीने पालखी मार्गावरील गावांशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. गावात कोरोनाची काय परिस्थिती आहे, याची विचारणा करण्यात आली आहे. याबाबतची माहिती आळंदी देवस्थानला (alandi devsthan) द्यावी, असे पत्र श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त डॉ. अभय टिळक यांच्या वतीने पालखी मार्गावरील गावांचे सरपंच व नगराध्यक्ष व महापौरांना पाठविले आहे. (alandi-devsthan-letter-villagers-sant dnyaneshwar maharaj palkhi sohala-satara-marathi-news)

आषाढी वारीपूर्वी चैत्री वारीच्या निमित्ताने पालखी मार्गावरील गावांचा पाहणी दौरा होतो. या दौऱ्यात मुक्कामाची ठिकाणे, रस्त्याची परिस्थिती, आरोग्य, पाणीपुरवठा, वीज आदी सुविधांचा आढावा घेतला जातो. चैत्र शुद्ध दशमीला पंढरपुरात आळंदी संस्थान, मानकरी, दिंडी समाज व फडकऱ्यांच्या बैठकीत वारीच्या वाटचालीबाबत चर्चा होते. तिथीची वृद्धी किंवा क्षय झाला तर मुक्कामाची ठिकाणे, वाढीव मुक्काम यावरही महत्त्वपूर्ण चर्चाही होते; परंतु गेल्या वर्षी कोरोनाच्या महामारीमुळे आषाढी पायी वारी झाली नाही. मागील वर्षी पंढरपुरात आषाढी वारीसाठी सर्व संतांच्या पालख्या राज्य शासनाने विशेष बसने पंढरपूरला आणल्या होत्या आणि आषाढी वारी साजरी झालेली होती.

हेही वाचा: 'खवळलेल्या समुद्राच्या डोंगरएवढ्या लाटांत सगळं उध्दवस्त झालं; जिवाभावाची माणसंही गेली'

गेल्या वर्षभरातील कोरोनाची स्थिती पाहिली तर कोरोना आता शहरात कमी आणि ग्रामीणमध्ये अधिक वाढू लागला आहे. त्यामुळे यंदा पायी वारी करायची, की गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही सर्व संतांच्या पालख्या विशेष बसद्वारे थेट पंढरपूरला न्यायच्या याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. प्रत्येक गावची कोरोना परिस्थिती जाणून घेण्यासाठीच हा पत्रव्यवहार केला आहे. पालखी सोहळ्याच्या वेळापत्रकानुसार यंदा दोन जुलैला श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान होणार आहे. आषाढी पायी वारीदरम्यान कोरोनाच्या फैलावासंदर्भातील सध्याची परिस्थिती व सोहळ्याचा मुक्काम आपल्या गावी असेल त्यावेळेची व संभाव्य परिस्थिती याचा विचार करता आषाढी वारीचे स्वरूप यंदा कसे असावे, या संदर्भात मत व भूमिका संस्थान समितीस लेखी कळवावे, अशी विनंती पत्रात करण्यात आली आहे.

विविध प्रश्‍नांबाबत मागितली मते

या पत्रामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षीपासून बंद असलेल्या आषाढी वारीला यंदा पोषक वातावरण आहे का? कोरोनाच्या प्रादुर्भावासंदर्भात आपल्या कार्यक्षेत्रातील आजची परिस्थिती नेमकी काय आहे? यंदाचा आषाढी सोहळा पायी वारीच्या स्वरूपात असावा का? सोहळयातील वारकरी भाविकांची संख्या किती असावी? किती संख्येपर्यंत वारकरी आपल्या गावाच्या कार्यक्षेत्रात येणे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपणास योग्य व सुरक्षित वाटते? मुक्कामाच्या तळावर आपण कोणकोणत्या सुविधा उपलब्ध करून देऊ शकता? यासंदर्भातील मत व भूमिका पत्राद्वारे कळविण्यास सांगण्यात आले आहे.

(alandi-devsthan-letter-villagers-sant dnyaneshwar maharaj palkhi sohala-satara-marathi-news)

ब्लाॅग वाचा