Dr. Atul Bhosale : झोपडपट्टी निर्मूलनासाठी सर्वतोपरी प्रयत्न : आमदार डॉ. अतुल भोसले
Karad News : आमदार डॉ. भोसले म्हणाले, ‘‘शहरासह दक्षिण विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकासाठी प्रयत्नशील आहे. प्राचीन मंदिरे, वास्तूंचे जतन व संवर्धन, वाहतुकीच्या समस्येसाठी नेकलेस रोड, नागरी सुविधा, आरोग्य सुविधा, पार्किंग, मिनी नवीन एमआयडीसीबाबत प्रामुख्याने काम करणार आहे.
कऱ्हाड : कऱ्हाड शहरासह मलकापुरातील झोपडपट्ट्यांचे निर्मूलन करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. आराखड्यानुसार एक हजार ६०० घरे बांधावी लागतील, त्यासाठीही प्रयत्न करणार असल्याची ग्वाही आमदार डॉ. अतुल भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.