Satara News : जिल्‍हा बँकेच्‍या सभेत पुन्‍हा ‘अमरप्रेम’ कहाणी; रामराजे नाईक निंबाळकर अन् उदयनराजे भोसले व्‍यासपीठावर एकत्र, दोघांमध्ये दिलखुलास चर्चा

महाराज आपले दर्शन निदान त्रास देण्यासाठी तरी घडू नये, अशी माझी विनंती आहे. शेवटी उदयनराजेंना बोलू शकणारा मी एकमेव माणूस आहे. बाकीचे कोणी धाडस करणार नाही.
Nitin Patil, Ramraje Naik Nimbalkar and Udayanraje Bhosale

Nitin Patil, Ramraje Naik Nimbalkar and Udayanraje Bhosale

sakal

Updated on

सातारा - जिल्ह्याच्‍या राजकारणाचा केंद्रबिंदू असणाऱ्या सातारा जिल्‍हा मध्‍यवर्ती बँकेच्‍या संचालक मंडळातील नेत्‍यांमध्‍ये कोण कोणाला त्रास देतो, कोण कोणावर कोठे नेम धरतो, अशा फारशा चर्चा बँकेच्‍या वर्तुळातून बाहेर येत नाहीत. उलट सहकाराचे हे मंदिर पक्षविरहित ठेवण्‍याचा प्रत्‍येकाचा प्रयत्‍न अनेकदा दिसतो. त्‍यानुसारच ज्‍येष्‍ठ नेते रामराजे, खासदार उदयनराजे यांच्‍यासारख्‍या मातब्‍बरांनी आज त्‍याचीच पुनरावृत्ती करत पुन्‍हा ‘अमरप्रेम’ कहाणीचे दर्शन घडवले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com