Ambavade : अंबवडेतील युवकाने राहत्या घरी गळफास घेऊन संपवले जीवन; वाठार पोलिस ठाण्यात घटनेची नोंद
Satara : शुभम सकुंडे बहिणीसोबत पाटखळ येथे गेला होता. बहिणीला सोडून तो मागे आला. त्या वेळी शुभमच्या घराचा दरवाजा उघडा दिसल्याने चुलत्याने घरात डोकावून पाहिले असता शुभम अँगलला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला.
A young man from Ambawade tragically ended his life by hanging at home. Wathar Police are investigating the incident, and a case has been filed.sakal
वाठार स्टेशन : अंबवडे संमत वाघोली (ता. कोरेगाव) येथे राहत्या घरी युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. शुभम महेश सकुंडे (वय २३) असे युवकाचे नाव आहे. याबाबत वाठार पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.