पृथ्वीराज चव्हाणांनी सार्थ ठरवला विश्वास, कऱ्हाडातील रुग्णालये घेणार मोकळा श्वास!

सचिन शिंदे
Sunday, 30 August 2020

राष्ट्रीय प्रश्नांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विविध माध्यमांद्वारे प्रश्न विचारून धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी आमदार चव्हाण यांनी प्रयत्न केला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन सुरू झाल्यापासून आजपर्यंत सातत्याने लोकोपयोगी उपक्रमांत आमदार चव्हाण यांनी भाग घेतलेला आहे. मतदारसंघातील जनतेशी थेट भेटीपासून ते मुंबईत जाऊन मुख्यमंत्र्यांच्या भेटी घेऊन प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले आहेत.

कऱ्हाड : कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्णसंख्या वाढली तरी सद्यःस्थितीत उपलब्ध कोरोना रुग्णालयांत व्हेंटिलेटरअभावी रुग्णांना बेड उपलब्ध होत नाहीत. त्याचा विचार करून माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी विशेष बाब म्हणून स्थानिक विकास निधीमधील 60 लाखांचा निधी कोरोनासाठी मंजूर केला आहे. त्यातून दोन रुग्णवाहिका आणि दहा व्हेंटिलेटर देण्यात  येणार आहेत. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन सुरू झाल्यापासून आजपर्यंत सातत्याने लोकोपयोगी उपक्रमांत आमदार चव्हाण यांनी भाग घेतलेला आहे. मतदारसंघातील जनतेशी थेट भेटीपासून ते मुंबईत जाऊन मुख्यमंत्र्यांच्या भेटी घेऊन प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले. त्यांनी गरजू लोकांना धान्याचे वाटप, गावागावांत स्वतः जाऊन कोरोनाबाबत जनजागृती, रेशन दुकानांमधून धान्यांचे योग्य प्रकारे वितरण होते का याची पाहणी करून रेशनिंग दुकानांच्या धान्य वितरणाबद्दल जनतेकडून काय अपेक्षा आहेत याची माहिती घेतली. त्यात आढळलेल्या त्रुटींबाबत अधिकाऱ्यांना सूचना देऊन त्या मार्गी लावल्या आहेत.

खाशाबा जाधवांना पद्मविभूषण पुरस्कार द्या : खासदार श्रीनिवास पाटील 

राष्ट्रीय प्रश्नांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विविध माध्यमांद्वारे प्रश्न विचारून धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी प्रयत्न केला आहे. त्यांनी मतदारसंघात मायक्रो कंटेनमेंट झोन राबविणे, अत्यावश्‍यक सेवा किमान वेळेत सुरू करणे अशा महत्त्वाच्या गोष्टी सुचविल्या व त्याच्या अंमलबजावणीसाठी आग्रही राहिले. त्यामुळे जनतेला लॉकडाउन काळात किमान सुविधांचा अभाव जाणवला नाही. कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.

जीएसटीबाबत अजित पवारांचे ते वक्तव्य दिशाभूल करणारे : देवेंद्र फडणवीस

रुग्णसंख्या वाढली, तरी सद्यःस्थितीत उपलब्ध कोरोना रुग्णालयांत व्हेंटिलेटरअभावी रुग्णांना बेड उपलब्ध होत नाहीत. त्याचा विचार करून चव्हाण यांनी विशेष बाब म्हणून स्थानिक विकास निधीमधील 60 लाखांचा निधी कोरोनासाठी मंजूर केला आहे. त्यातून दोन रुग्णवाहिका आणि दहा व्हेंटिलेटर देण्यात येणार आहेत. त्यातील दोन रुग्णवाहिका कऱ्हाड व मलकापूर पालिकेस, तर व्हेंटिलेटर हे वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयासह अन्य कोरोना रुग्णालयास देण्यात येतील.

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ambulances And Ten Ventilators To Hospitals From MLA Prithviraj Chavan