Malharpeth Crime : नवारस्ता येथे एकास जागेच्या वादातून मारहाण; पाेलिस ठाण्यात फिर्याद दाखल
Patan News : जेसीबी चालकाने पत्रा, अँगल ओढून भिंत पाडली. विरोध करताना झटापट झाली. त्यात पाठीमागील १४ बोकडांच्या अंगावर अँगल व साहित्य पडल्याने ती जखमी झाली. शेड पाडल्याने त्यांचे चार लाखांचे नुकसान झाले आहे.
मल्हारपेठ : जागेच्या वादातून नवारस्ता येथे एकास बेदम मारहाण केल्याची घटना घडली. याबाबत अशोक यशवंत घाडगे- पाटील (वय ५१, रा. नवारस्ता) यांनी मल्हारपेठ पोलिसात फिर्याद दिली.