
विशेष मुलांच्या आयुष्यात आशेचा किरण आणणाऱ्या अनेक सामाजिक संस्था कार्यरत आहेत. या शाळांतील शिक्षक, शिक्षणाची पद्धत, पालकांचे योगदान या सगळ्यांमुळे विशेष मुले हळूहळू का होईना समाजात रुळत आहेत. गेल्या साडेतीन दशकांपासून विशेष मुलांसाठी सातत्याने झटणारी संस्था म्हणजे ‘आनंदबन मतिमंद मुलांची शाळा व व्यवसाय प्रशिक्षण केंद्र’. या संस्थेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्यामुळे विशेष मुलं आणि त्यांच्यात जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले आहे.
-स्वप्नील शिंदे, सातारा