Special children from Anandban planting seeds of happiness during the Shiv Rajyabhishek ceremony in Satara, a beautiful tribute to Shivaji Maharaj’s legacy.Sakal
सातारा
Anandban : ’आनंदबन’च्या विशेष मुलांनी पेरली आनंदाची बीजे; सातारकरांनी अनुभवला शिव राज्याभिषेकाचा नेत्रदीपक सोहळा
Satara News : स्नेहसंमेलनामध्ये ७५ विशेष मुले व मुलींनी अतिशय उत्कृष्ट प्रकारे गीते, नृत्ये सादर केली. रामायणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली, तर शिवराज्याभिषेकाने सांगता झाली.
सातारा : ती सारी देवाची लेकरे. देव सर्वांना सारे काही देतो; पण काही जणांना काही देण्याचे तो राहून जातो, तरीही ती मुले आपल्या न्यूनत्वावर मात करत जीवन जगतात. केवळ जीवन जगतातच असे नाही तर ती स्वतःबरोबर इतरांच्या जीवनातही आनंदाची पखरण करतात. याचा प्रत्यय येथील आनंदबन मतिमंद मुलांच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी दिला आणि त्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमास सातारकरांनी टाळ्यांच्या कडकडाटाने दाद दिली.

