FasTag : आनेवाडी टोलनाक्‍यानजीक वाहनधारकांची खुलेआम लूट

FasTag : आनेवाडी टोलनाक्‍यानजीक वाहनधारकांची खुलेआम लूट
Updated on: 

सायगाव (जि. सातारा) : कायम कोणत्या ना कोणत्या कारणासाठी प्रसिद्ध असणाऱ्या पुणे-बंगळूर महामार्गावर असलेल्या आनेवाडी टोलनाक्‍यावर खासगी एजंट वाहनधारकांची गरज व अडचण लक्षात घेऊन फास्टॅग (FasTag) काढण्यासाठी 500 ते 600 रुपयांची मागणी करून खुलेआम लूट करत आहेत. 

वाहतूक सुरळीत आणि वेगाने होण्याच्या दृष्टीने महामार्गावर असलेल्या सर्व टोलनाक्‍यांवर 16 फेब्रुवारीपासून सर्व वाहनांना फास्टॅग अनिवार्य केला गेला आहे. फास्टॅग नसणाऱ्या वाहनांकडून दुप्पट टोल आकारण्यात येऊ लागला आहे. दुप्पट टोल भरण्यास लागत असल्याने अनेक वाहनधारक टोलनाक्‍यावरील फास्टॅग केंद्रावर गर्दी करू लागले, तर अनेक खासगी कंपन्यांनी आपले एजंट टोलनाक्‍यांवर उभे करत फास्टॅगची दुकाने थाटली आहेत. या ठिकाणी फास्टॅगसाठी 16 फेब्रुवारीपूर्वी हे एजंट 200 रुपये घेत होते, तेच एजंट आता 500 ते 600 रुपये तसेच मनाला वाटेल तेवढे पैसे मागताना दिसत आहेत.

रागाच्या भरात तो घरातून निघून गेला. याची माहिती आईने कुटुंबियांना दिली परंतु...

या खासगी एजंटांकडून 100 रुपये बॅलन्ससाठी आणि 100 रुपये प्रोसेसिंगमध्ये फास्टॅग मिळत होता. मात्र, आता महामार्गावरील टोलनाक्‍यावरील फास्टॅगची गरज पाहून आता हे एजंट फास्टॅगसाठी 150 रुपये बॅलन्ससाठी आणि 150 रुपये प्रोसेसिंग फी आणि 200 रुपये डिपॉझट घेत आहेत, तर हे एजंट मनाला वाटेल तसे वाहनधारकांकडून टॅगसाठी पैसे घेत आहेत. यापूर्वी खासगी फास्टॅग एजंट टॅग खपवण्यासाठी मोठी धडपड करीत होते. नाममात्र फी घेऊन आपल्याकडील टॅगची विक्री करत होते. त्यावेळी 100 रुपये प्रोसेसिंग फीऐवजी 50 रुपयेसुद्धा घेत होते. मात्र, 16 तारखेपासून वाहनांसाठी फास्टॅग अनिवार्य झाल्याने या खासगी एजंटांनी आपले रंग दाखवण्यास सुरुवात केली आहे. 

टोलनाका व्यवस्थापन ढिम्म 

दरम्यान, याबाबत टोलनाका व्यवस्थापनाला विचारले असता कोणत्याही प्रकारची माहिती त्यांच्याकडून दिली जात नाही. मात्र, येथील कर्मचारी वर्गाला देखील फास्टॅगचे प्रशिक्षण दिले असून, कर्मचारीदेखील फास्टॅग एजंट झालेले पाहावयास मिळत आहेत. एकूणच मोठ्या प्रमाणात वाहनचालकांची लूट होत असल्याचे दिसत आहे. 

ग्रामस्थांनाे! महिनाभर आठवडा बाजार राहणार बंद

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Khambatki Ghat traffic jam latest news
Farmers Demand ₹5,500 Per Tonne for Sugarcane
cotton cultivation in Phaltan taluka 2026
Raju Shetti warning to sugar factories
Marathi News Esakal
www.esakal.com