

High Court Decision on Anil Desai and Rajendra Rajpure Election Eligibility Creates Legal Uncertainty for Seven Other Directors
sakal
सातारा: उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयामुळे जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत वेगळाच ट्विस्ट निर्माण झाला आहे. विद्यमान संचालक अनिल देसाई व राजेंद्र राजपुरे यांना दहा वर्षे संचालक असल्याच्या कारणावरून ही निवडणूक लढण्यास उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाचे न्यायामूर्ती शैलेश ब्रह्मे यांनी अपात्र ठरविले आहे. त्यामुळे आता दहा वर्षे पूर्ण झालेल्या उर्वरित सात संचालकांच्या उमेदवारीबाबत कायदेशीर पेच निर्माण झाला आहे. सहकार निवडणूक प्राधिकरण किंवा राज्य शासन याबाबत काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.