शेतक-यांनाे! जनावरांचा दवाखाना आता एकाच सत्रात राहणार सुरु

संजय जगताप
Monday, 11 January 2021

नव्या परिपत्रकानुसार डॉक्‍टरांना सोयीचे झाले आहे. तालुक्‍याच्या, शहराच्या ठिकाणी राहणाऱ्या संबंधित डॉक्‍टरांना आता दोन वेळा दवाखान्यात हेलपाटे मारायला लागणार नाहीत. त्यामुळे बदललेली वेळ त्यांच्या पथ्यावर पडली आहे. 

मायणी (जि. सातारा) : राज्यात जनावरांच्या दवाखान्यांच्या स्थापनेपासून प्रथम दवाखान्यांच्या निर्धारित वेळेत शासनाने बदल केला आहे. त्यानुसार आता सकाळी व दुपारी अशा दोन सत्रांऐवजी एकाच सत्रात सकाळी नऊ ते दुपारी साडेचार असे दवाखाने सुरू राहणार आहेत. त्याबाबतचा आदेश नुकताच जारी करण्यात आला आहे. जनावरांचे दवाखाने राज्यात उभारल्यापासून त्यांची वेळ फेब्रुवारी ते सप्टेंबर आणि ऑक्‍टोबर ते जानेवारी या कालावधीत वेगवेगळी होती. फेब्रुवारी ते सप्टेंबर या कालावधीत सकाळी सात ते दुपारी सव्वाबारा आणि पुन्हा दुपारी चार ते सायंकाळी सहा अशी दोन सत्रांमध्ये होती. याबराेबरच ऑक्‍टोबर ते जानेवारी या थंडीच्या कालावधीमध्ये सकाळी आठ ते दुपारी सव्वा आणि दुपारी तीन ते सायंकाळी पाच अशी होती. शनिवारी मात्र सकाळी एकाच सत्रात कामकाज होत असे. दुपारी सुटी असायची. आता बदललेल्या वेळापत्रकानुसार सोमवार ते शुक्रवार सकाळी नऊ ते दुपारी साडेचारपर्यंत अशी वेळ निर्धारित करण्यात आली आहे. त्यात दुपारी एक ते दीड वाजेपर्यंत जेवणासाठी सुटी देण्यात आली आहे. शनिवारची वेळ सकाळी आठ ते दुपारी एक अशी ठेवण्यात आली आहे. 

शंभूराज देसाईंच्या गटातील मतभेदाचा फायदा एनसीपी च्या गटास हाेणार ?

दरम्यान पशुपालकांना आकस्मिक प्रसंगी चोवीस तास सेवा देणे आवश्‍यक आहे. बदललेल्या त्या वेळेचा आदेश श्रेणी एक व श्रेणी दोनचे सर्व पशुवैद्यकीय दवाखाने, तालुका लघु सर्व चिकित्सा, जिल्हा पशु सर्वचिकित्सालय व फिरत्या पशुवैद्यकीय दवाखान्यांसाठी लागू करण्यात आले आहेत. कृषी पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाचे कार्यासन अधिकारी दि. ज. शेडमेखे यांच्या सहीने ते परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे. त्यानुसार कामकाज करण्याचे आदेश सर्व स्तरावरील संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

कल काेल्हापूर महापालिकेचा : राईट टू रिकॉल’ हवाच यासाठी मोठी पसंती 
 
दरम्यान, नव्या परिपत्रकानुसार डॉक्‍टरांना सोयीचे झाले आहे. तालुक्‍याच्या, शहराच्या ठिकाणी राहणाऱ्या संबंधित डॉक्‍टरांना आता दोन वेळा दवाखान्यात हेलपाटे मारायला लागणार नाहीत. त्यामुळे बदललेली वेळ त्यांच्या पथ्यावर पडली आहे. 

""जनावरांच्या दवाखान्यांची आधीची वेळ शेतकऱ्यांच्यादृष्टीने सोयीची होती. सकाळी सात-आठ या वेळेत जनावरे दवाखान्यात दाखवून दिवसभर शेतात जाता येत होते. अन्यथा सायंकाळी चार ते पाच या वेळेत शेतातून येताना दवाखान्यात जाता येत होते.'' 

दिनकर थोरात, शेतकरी, मायणी 

राजे गटातच पडली फूट; जाधववाडीच्या निवडणुकीची वाढली चूरस

पाच वर्षांत पुलाखालून बरेच पाणी गेल्याने शिखर शिंगणापुरची निवडणुक रंगणार

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Animal Husbandary Hospital Timing Change Satara Marathi News