
- अमोल जाधव
शेणोली : स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना यश गवसत नसल्याने जवळचे नातलग एखादी नोकरी कर, असे म्हणायचे; पण ती आपल्या ध्येयापासून बाजूला न हटता प्रयत्न करत राहिली. जिद्द व अभ्यासात सातत्य टिकवले अन् तिने अखेर महसूल सहायक पदावर यशाची मोहर उमटवली. ही यशकथा आहे, एका मोटारसायकल गॅरेज मालकाच्या मुलीची. संजयनगर (शेरे) येथील एका सर्वसामान्य कुटुंबातील अनिशा महादेव मदने हिने राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत महसूल सहायक पदावर यश मिळवले आणि मदने कुटुंबात पहिली महिला अधिकारी बनण्याचा मान तिला मिळाला.