

Anjali Godse Ideal Teacher Award
esakal
सातारा: शिक्षकाचे महत्त्व प्रत्येकाच्या आयुष्यात अनमोल असते, पण आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांवर स्वतःच्या मुलाप्रमाणे प्रेम करणारे शिक्षक आज बोटावर मोजण्या इतकेच उरले आहेत. त्यापैकीच एक म्हणजे जावली तालुक्यातील कुडाळच्या जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका अंजली गोडसे. केवळ वर्गातील अध्यापन पुरेसे नाही, हे ओळखून त्यांनी शिक्षणाला चार भिंतींच्या बाहेर नेले आहे.