Karad News : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्यावतीने आत्तापर्यंत राज्यातील एक लाख ३२ हजार २४३ लाभार्थ्यांना ११ हजार २१ कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. महामंडळाकडुन एक लाख १३ हजार ७०१ लाभार्थ्यांना १०७४ कोटी ६६ लाखांचा व्याज परतावा देण्यात आल्याची माहिती महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.