
मायणी : येथील माजी सरपंच व मेडिकल कॉलेजचे माजी संचालक अप्पासाहेब रामचंद्र देशमुख यांची मुंबई उच्च न्यायालयाने अखेर जामिनावर मुक्तता केली. गेल्या २८ महिन्यांपासून ईडीने त्यांना अटक केली होती. आज उच्च न्यायालयाकडून देशमुख यांना तीन लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर व महिन्यातून दोन वेळा ईडीच्या कार्यालयात हजेरी लावण्याच्या अटीवर सशर्त जामीन मंजूर केला.