पक्ष बळकटीसाठी शरद पवारांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोचविणार : चव्हाण

पक्ष बळकटीसाठी शरद पवारांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोचविणार : चव्हाण

कवठे (जि. सातारा) : वाई तालुका राष्ट्रवादी युवती अध्यक्षपदी सुरूर (ता. वाई) येथील दामिनी शरद चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली. याबाबतचे पत्र आमदार मकरंद पाटील यांनी चव्हाण यांना दिले. 

या वेळी जिल्हा युवती अध्यक्षा पूजा काळे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शशिकांत पवार, उद्योजक शरद चव्हाण आदी उपस्थित होते. चव्हाण यांचे वाई तालुक्‍यातील विविध मान्यवरांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. पक्ष बळकटीसाठी, तसेच पक्षाची ध्येय, धोरणे व ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचविणार आहे. त्याचबरोबर जनतेच्या समस्या सोडविण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्षाचा विस्तार वाढविण्यासाठी युवकांना संघटित करुन राष्ट्रवादी घराघरापर्यंत पोहचवणार आहे. विविध समाजामध्ये सलोखा राहण्यासाठी जिल्हापातळीवर आमचा प्रयत्न राहणार असल्याचे चव्हाण यांनी या निवडीनंतर सांगितले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com