esakal | माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारीपदी प्रभावती कोळेकर
sakal

बोलून बातमी शोधा

Prabhavati Kolekar

प्राथमिक शिक्षणाधिकारी कोळेकर यांच्याकडे प्रभारी कार्यभार देण्यात आला होता.

माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारीपदी प्रभावती कोळेकर

sakal_logo
By
प्रशांत घाडगे

सातारा : जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर (Prabhavati Kolekar) यांची माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारीपदी राज्य शासनाने (Maharashtra Government) नियुक्ती केली. श्रीमती कोळेकर यांच्याकडे माध्यमिकची जबाबदारी आल्याने आता प्राथमिक शिक्षणाधिकारीपद रिक्त राहणार असून या पदावर कोणाची वर्णी लागणार, याची उत्सुकता आहे.

गेल्या सहा महिन्यांपूर्वी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर (Education Officer Rajesh Kshirsagar) यांना पुणे येथे अल्पसंख्याक विभागात उपसंचालकपदी बढती मिळाल्यामुळे हे पद रिक्त होते. सुरुवातीच्या काळात उपशिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे यांच्याकडे तात्पुरता कार्यभार दिला होता. त्यानंतर पुन्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर (Primary Education Officer Prabhavati Kolekar) यांच्याकडे प्रभारी कार्यभार देण्यात आला होता. मात्र, राज्य शासनाने माध्यमिक शिक्षणाधिकारीपदी प्रभावती कोळेकर यांची नियुक्ती केली आहे.

हेही वाचा: NCP च्या आमदार शिंदेंना चुकांच्या परिमार्जनाची संधी

दरम्यान, कोळेकर यांनी प्राथमिक शिक्षण विभागात एज्युकेशन विईथ रेडिओ, बेसलाइन सर्वे, शिक्षक सक्षमीकरण कार्यक्रम, ऑनलाइन एज्युकेशन सद्य:स्थिती सर्वेक्षण, केंद्रस्तरावर शिक्षण परिषद, शासनाच्या दिशा अ‍ॅपचा अध्ययन, अध्यापनात प्रभावी वापर, सगुण विकास कार्यक्रम, जिल्हा गुणवत्ता कक्ष, थँक ए टीचर कार्यक्रम व स्पर्धा, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, शैक्षणिक साहित्यनिर्मिती, मैत्री करूया विज्ञान व गणिताशी, गोष्टीचा शनिवार असे विविध उपक्रम राबविले होते. तसेच दोन दिवसांपूर्वी कोळेकर यांची राज्य शासनाने गाभा समितीवर नियुक्ती केली आहे.

loading image
go to top