"अटक करा, अटक करा, जयकुमारला अटक करा'; दहिवडीत बोंबाबोंब मोर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

strike Dahiwadi Dalit community staged Maan tehsil office

"अटक करा, अटक करा, जयकुमारला अटक करा'; दहिवडीत बोंबाबोंब मोर्चा

दहिवडी : 'अटक करा, अटक करा, जयकुमारला अटक करा', 'दलित समाजाची जमीन हडप करणार्‍या आमदार जयकुमार गोरेचं करायचं काय, खाली मुंड वर पाय', 'धिक्कार असो धिक्कार असो, आमदार जयकुमार गोरेचा धिक्कार असो' अशी जोरदार घोषणाबाजी करत दलित समाजाने आज आमदार जयकुमार गोरे यांना तत्काळ अटक करावी या मागणीसाठी माण तहसील कार्यालयावर बोंबाबोंब मोर्चा काढला.यावेळी किशोर सोनवणे, माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप तुपे, गणेश भिसे, संभाजी लोखंडे, मोतीलाल खंदारे, सचिन शिंदे, धनाजी अहिवळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

किशोर सोनवणे म्हणाले, मयत दलित व्यक्तीची जमीन बोगस व्यक्ती उभा करुन हडप केल्याप्रकरणी आमदार गोरे यांच्यावर पंधरा दिवसांपूर्वी अॅट्राॅसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल असून आजपर्यंत त्यांना अटक करण्यात आली नाही. आमदार गोरे हे केंद्र व राज्यातील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून पोलिस प्रशासनावर दबाव आणून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. आमदार गोरे हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून असे अनेक गुन्हे त्यांनी केले आहेत. त्यामुळे त्यांना तत्काळ अटक करुन या गुन्ह्याची सखोल करावी.

दिलीप तुपे म्हणाले, पळपुटे आमदार जयकुमार गोरे यांच्या लुटारु वाळूचोरांकडून आमच्या एकाही कार्यकर्त्याच्या केसाला धक्का लागला किंवा त्रास झाला तर त्यांना आम्ही सरळ करु. पोलिसांनी जयकुमार गोरे यांना अटक न केल्यास १ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल.यावेळी आमदार जयकुमार गोरे यांना तत्काळ अटक करावी या मागणीचे निवेदन तहसीलदार सुर्यकांत येवले यांना देण्यात आले.

देवेंद्र फडणवीस यांची दुटप्पी भूमिका चालणार नाही.

"देवेंद्र फडणवीस यांनी आमदार गोरे यांच्यावर केलेली केस खोटी आहे असे वक्तव्य केले. त्यांना असं म्हणायचं आहे का, दलित समाज अॅट्राॅसिटीच्या खोट्या केस करतो. त्यांनी तसं स्पष्ट बोलावं. एकीकडे आमदारांना खुश करण्यासाठी असं वक्तव्य करायचं अन दुसरीकडे जय भीम बोलायचं असं चालणार नाही. त्यांचा आम्ही निषेध करतो." किशोर सोनवणे

Web Title: Arrest Jayakumar Morcha Strike Dahiwadi Dalit Community Staged Maan Tehsil Office Demanding Immediate Arrest Mla Jayakumar Gore

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top