Sharad Pawar : शरद पवारांच्या केसाला जरी धक्का लागला, तर..; जीवे मारण्याच्या धमकीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करा.
NCP leader
NCP leader sakal
Summary

शिंदे, फडणवीस सरकारमधील मंत्री व आमदार अशा धमक्या देत असतील, तर या सरकारकडून काय अपेक्षा ठेवायची.

सातारा : राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करून तत्काळ अटक करावे, शरद पवार यांना झेड प्लस सुरक्षा द्यावी.

तसेच राणे, मुनगंटीवार, पडळकर यांच्यावरही गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राष्ट्रवादी महिला आघाडीने (NCP Mahila Aghadi) पोलिस अधीक्षकांकडे केली आहे. पवार यांच्या केसाला जरी धक्का लागला, तर हे सरकार त्याला जबाबदार असेल, अशा इशारा महिलांनी दिला आहे.

NCP leader
Dhananjay Mahadik : देशाचा चेहरामोहरा बदलण्याचं काम मोदींनी केलंय; महाडिकांकडून तोंडभरुन कौतुक

याबाबतचे निवेदन अतिरिक्त पोलिस अधीक्षक बापू बांगर यांना दिले आहे. राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा संजना जगदाळे यांच्या नेतृत्वाखालील पदाधिकाऱ्यांनी हे निवेदन दिले. या वेळी महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्षा समिंद्रा जाधव, जिल्हा संपर्क प्रमुख कुसुमताई भोसले, नलिनी जाधव, वैशाली सुतार, सातारा तालुकाध्यक्षा मेघा नलावडे, संगीता ढाणे, डॉ. सुनीता शिंदे, पूजा काळे, स्मिता देशमुख, शुभांगी कांबळे आदी महिला उपस्थित होत्या.

NCP leader
Karnataka : बुद्ध-बसव-आंबेडकरांना मानणारा नेता बनला बेळगावचा 'पालकमंत्री'; मुख्यमंत्र्यांकडून नियुक्ती

निवेदनात महिला आघाडीने म्हटले, की खासदार शरद पवार यांना ट्विटरवरून तुमचा दाभोलकर करून टाकू, अशी धमकी देण्यात आली आहे. या व्यक्तीचा शोध घेऊन त्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे, तसेच नीलेश राणे (Nilesh Rane), सुधीर मुनगंटीवार, गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) हे सतत अरेरावीची भाषा करतात.

NCP leader
Karnataka : 'या' दोन बड्या नेत्यांनी उडवली माजी पंतप्रधानांची झोप; आता पक्ष वाचवण्यासाठी करावा लागतोय संघर्ष

शिंदे, फडणवीस सरकारमधील मंत्री व आमदार अशा धमक्या देत असतील, तर या सरकारकडून काय अपेक्षा ठेवायची. शरद पवार यांना झेड प्लस सुरक्षा द्यावी. राणे, मुनगंटीवार, पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करावा. श्री. पवार यांच्या केसाला जरी धक्क लागला, तर हे सरकार त्याला जबाबदार असेल, अशा इशारा या महिलांनी दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com