
विकास जाधव
सातारा : कृत्रिम बुद्धिमत्तेचा (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) वापर करून ऊस उत्पादन वाढीचा प्रकल्प बारामतीमधील कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर यशस्वी झाला. या प्रकल्पातून प्रेरणा घेत सर्कलवाडी (ता. कोरेगाव) येथील डॉ. युगंधर राजेंद्र सरकाळे या उच्चशिक्षित युवा शेतकऱ्याने डाळिंब बागेमध्ये काटेकोर शेती व्यवस्थापनाच्या सोबत ‘एआय’ तंत्रज्ञान वापरण्यास सुरुवात केली. डाळिंब झाडांच्या जोमदार वाढीसाठी याचे चांगले परिणाम दिसून आले आहेत.