अंत्यसंस्कार सहाय्यक मंडळ माहुलीत विद्युतदाहिनी उभारणार : अरुण गोडबोले

sakal logo
sakal logo
Updated on: 

सातारा : शहर व परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून पावसाळ्यात आणि महापूराच्यावेळी अंत्यसंस्कार सहाय्यक मंडळाच्या माध्यमातून संगम माहुली येथे कृष्णा आणि वेण्णा नदीच्या संगमाजवळील रस्त्याशेजारील शेडमध्ये उभारण्यात आलेल्या अग्निकुंडामध्ये अंत्यसंस्कार होत आहेत. आगामी काळात सातारचे अंत्यसंस्कार सहाय्यक मंडळ सातारकरांच्या सेवेसाठी गॅसवरील विद्युतदाहिनीची सोय करण्याच्या प्रयत्नात आहे, अशी माहिती अंत्यसंस्कार सहाय्यक मंडळाचे अध्यक्ष अरुण गोडबोले यांनी दिली.

गोडबोले म्हणाले,  सातारा शहर व परिसरातील निधन झालेल्या स्त्री पुरुषांच्या पार्थिवावर विनाशुल्क अंत्यसंस्कार करण्याची सोय सुरू आहे. पुर्वीपासूनच सातारकर जनतेसाठी या माध्यमातून मृतदेह नेण्यासाठी सुद्धा वाहनाची सोय करण्यात आलेली आहे. या मंडळाच्या वतीने अग्निकुंड तसेच शेडही उभी आहे.

सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या काही महिन्यांपासून सुरु असल्याने आपणही त्यातून वगळले गेलो नाही. त्यामुळे अन्य ठिकाणी जागा उपलब्ध न झाल्यास सध्याचे वातावरण लक्षात घेता कोरोनाबाधित रुग्ण सोडल्यास इतरांना अंत्यसंस्कार सहाय्यक मंडळाच्या शेडमधील अग्निकुंडामध्ये अंत्यसंस्कार करण्यास कोणतीही हरकत नाही आणि हे सर्व विनाशुल्क करण्यात येते.

अर्थात अग्नी संस्कार करण्यापूर्वी संबंधित मृत व्यक्तीचे मृत्यूचा दाखला , आधार कार्ड झेरॉक्स, फोटो व जवळच्या नातेवाईकांची ही आधार कार्ड झेरॉक्स व फोटो तेथे द्यावा आणि या मोफत सेवेचा उपयोग करावा, असे आवाहनही गोडबोले यांनी केले आहे. 

आगामी काळात सातारचे अंत्यसंस्कार सहाय्यक मंडळ सातारकरांचे सेवेसाठी गॅसवरील विद्युतदाहिनीची सोय करण्याच्या प्रयत्नात आहे. त्याचबरोबर सध्या मंडळाकडे मृतदेह प्रिझर्व करण्यासाठी शीतपेटीची सोयही करून देण्यात आलेली आहे. त्याचाही फायदा सातारकर घेत असतात. अंत्यसंस्कार सहाय्य मंडळ सातारकरांचे सेवेसाठी सन 1946 पासून उपलब्ध असून आजही सेवेत असल्याचे गोडबोले यांनी नमूद केले.

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pune Bengaluru Highway to Karad City
Satara News 17 Year Old Girl Dies In Family Dispute Over Mobile Phone And Television Father Loses His Temper
why Tapoḷa Ahir bridge is closed for traffic
Satara 17-year-old girl death case
Marathi News Esakal
www.esakal.com