
-सुनील शेडगे
सातारा : जावळी तालुक्यातील आसनी येथील जिल्हा परिषद शाळेत शिकणारी चिमुरडी शौर्य पुरस्काराची मानकरी ठरली आहे. नवी दिल्लीत प्रजासत्ताकदिनी आयोजित सोहळ्यात देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते तिचा गौरव होणार असून, राजनंदिनी संदीप घोरपडे असे त्या चिमुरडीचे नाव.