तोंडे बघून मलकापूरात 'अतिक्रमण'ची कारवाई कशासाठी? अशोकराव थोरात

तोंडे बघून मलकापूरात 'अतिक्रमण'ची कारवाई कशासाठी? अशोकराव थोरात

मलकापूर (जि. सातारा) : पालिका प्रशासनाने विनापरवाना बांधकाम हटावची मोहीम राबवली. तोंडे बघून मोजकीच कारवाई केली. या बेकायदेशीर मोहिमेचा आम्ही सर्वपक्षीय अन्याय निवारण समितीतर्फे निषेध करतो, असा आरोप अशोकराव थोरात यांनी पत्रकाद्वारे दिली.
मलकापूर अतिक्रमण मोहिमेस स्थगिती : अशोकराव थोरात
 
पत्रकातील माहिती अशी, महामार्गाच्या दोन्हीही बाजूच्या शेड व कच्चे बांधकाम करणाऱ्या एकूण 292 लोकांना 48 तासांची नोटीस देणे हे बेकायदेशीर आहे. यापूर्वी कारणे दाखवा नोटीस, पुरेशा कालावधीचे बांधकाम काढून घेण्याची नोटीस दिलेली नाही. 

संबंधित मालमत्ताधारक मुख्याधिकाऱ्यांना भेटण्यास गेले असता त्यांनी संबंधिताचे खुलासे हातात न घेता उलट भीतीदायक भाषा वापरली. शासकीय अधिकाऱ्याने नगरपालिका आणि नागरिक यांच्यातील दुवा म्हणून व शहरात शांतता व सहकार्य राहील, असे काम केले नाही. त्यांच्या दीड महिन्याच्या नेमणुकीत अतिवृष्टी व कोरोना कालावधी अशी महत्त्वाची कामे बाजूला ठेऊन आर्थिक संकटातही अनेकांचा रोजगार व उत्पन्न बंद होईल, असे वातावरण केले. फक्त महामार्गाच्या बाजूच्या लोकांनाच नोटिसा दिल्या.

भुईंज : अजून किती महिने रावसाहेब करणार अंधारात काम? 

मलकापूर गावठाण, ढेबेवाडी रोड, जखीणवाडी रस्त्यासह शहरातील इतर ठिकाणी का नाही? मोहीम सरसकट का केली नाही? अनेकांची कच्ची बांधकामे व शेडचे परवाने अनेक वर्षांपासून नाकारले. शिवाय त्यांच्याकडून कर घेतला अशांना नोटिसा का दिल्या? अनेकांचे व्यवसाय सुरू झाले. त्या वेळी मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक झोपले होते का? असे सवाल उपस्थित केले. पत्रकावर अशोकराव थोरात यांच्यासह प्रशांत गावडे, अण्णासाहेब काशीद, विश्वास चव्हाण यांच्या सह्या आहेत.

काळजी करुन नका! तुमच्यावर कारवाई हाेणार नाही; पृथ्वीराज चव्हाणांचा व्यावसायिकांना दिलासा 

Edited By : Siddharth Latkar
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com