

educational study tour.
sakal
गोंदवले : शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे असं म्हटलं जातं.पण हेच दूध पिढ्यांपिढ्या अज्ञानाचा दिवा तेवत असलेल्या कुटुंबातील व गोंदवल्याच्या आश्रमशाळेतील चार विद्यार्थ्यांनी पचवलंय.बुद्धी कौशल्याच्या जोरावर या विद्यार्थ्यांची पुणे विभागातून इस्रो या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या विशेष अभ्यास सहलीसाठी निवड झाली आहे.येत्या १६ ते २० फेब्रुवारी दरम्यान हे विद्यार्थी पहिल्यांदाच विमान सफर करत ही अभ्यास सहल पूर्ण करणार आहेत.