
कऱ्हाड : येथील नगरपालिकेत सहाय्यक नगररचनाकार अधिकाऱ्यास एकाने मारहाण केल्याची घटना आज घडली. या घटनेच्या निषेधार्थ दुपारपासून पालिकेत काम बंद आंदोलन केले. या प्रकरणी नगररचना सहाय्यक सचिन संभाजी पवार (रा. हजारमाची) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार हर्षद दत्तात्रय बदामी (वय ३७, रा. सोमवार पेठ, कऱ्हाड) यांच्यावर गुन्हा नोंद केल्याची माहिती शहर पोलिसांनी दिली.