बाळूमामाच्या रुपात सिध्दनाथाला पाहून, भाविक गेले आनंदून!

जयंत पाटील
Thursday, 19 November 2020

१९९५ साली सिध्दनाथ मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला, तेव्हापासून ही पोशाखाची परंपरा अखंड सुरू आहे. याच काळात मंदिर विद्युत रोषणाईने सजवले जाते.

कोपर्डे हवेली (जि. सातारा) : येथील श्री सिध्दनाथ मंदिरात नवरत्नकाळात पोषाखाव्दारे देवाला विविध रुप देऊन पूजा बांधण्यात येते. उपवासाच्या चौथ्या दिवशी शुक्रवारी बाळूमामाच्या रुपात मनमोहक पूजा बांधण्यात आली होती. 

१९९५ साली सिध्दनाथ मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला, तेव्हापासून ही पोशाखाची परंपरा अखंड सुरू आहे. याच काळात मंदिर विद्युत रोषणाईने सजवले जाते. गावातील विद्युत क्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी व सर्व युवक, ज्येष्ठ मिळून हे विद्युत रोषणाईचे काम करतात. 

कोपर्डे हवेलीत सिध्दनाथ-माता जोगेश्वरी वाघावर स्वार; भाविकांचे वेधले लक्ष

जोतिबा रुपातील, तसेच सिध्दनाथ-माता जोगेश्वरी वाघावर स्वार अशा विविध रुपातील पूजा बांधण्यात आली. देवाची ही विविध रुपे पाहण्यासाठी युवक, युवती, ग्रामस्थांसह अबालवृद्ध देखील दररोज न चुकता मंदिरामध्ये येतात. बारा दिवस मंदिरामध्ये भक्तीमय वातावरणात कीर्तन, प्रवचन, काकड आरती व धार्मिक विधी केले जातात. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाचे नियम पाळूनच मोजक्या लोकांच्या उपस्थितीत सर्व विधी केले जात आहेत. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Attractive Worship Is Being Performed At The Siddhanath Temple At Koparde Haveli Satara News